Kolhapur Rain Update: कोल्हापुरात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. धरणक्षेत्रातून पाण्याचा विसर्ग जोरदार सुरु आहे. परिणामी पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे. तर एका तासात पाणीपातळीत साडेतीन फुटाची वाढ झाली आहे. आतापर्यंत ४६ बंधारे पाण्याखाली गेले असून,पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. काल रात्री करूळ व भुई बावडा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक फोडा घाट मार्गे करणेत आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Previous Articleघडाळ्याचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील पण लोकशाही वाचवावी लागेल; पृथ्वीराज चव्हाण
Next Article मुसळधार पावसाने कोसळलं घर









