Kolhapur Rain News : कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर दमदार पाऊस असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढ झाली आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. आज सकाळी भोगावती नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात दोन फुटांची तर काळम्मावाडी धरणात एक मीटर पाणी पातळीची वाढ झाली आहे.
मे महिन्याच्या दरम्यान नदीतील पाणी पातळी कमी झाली होती. त्यावेळी पाणी उपसासाठी महापालिकेने बंधाऱ्यात बरगे लावले. मात्र हे बरगे अजून नदीतच आहेत. सध्या पाणी वाहून जाण्यासाठी बरगे काढणे आवश्यक आहे. ते काढले नसल्याने बंधाऱ्याला धोका पोहचू शकतो. तसेच आज सकाळी 9 वाजता बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले. तरीसुद्धा अजून धोकादायक वाहतूक सुरु आहे.









