प्रतिनिधी,गगनबावडा
Kolhapur Rain Update : शुक्रवारी कमी झालेल्या पावसाचा जोर शनिवारी पहाटे पासून पुन्हा वाढला आहे.दुपारपर्यंत मुसळधार पावसाने झोडपले.गगनबावडा तालुक्यातील कुंभी धरण ७० टक्के भरले आहे. तर उर्वरित कोरे,वेसरफ व अणदूर ही तिन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.कुंभी धरण क्षेत्रात १३२ तर कोदे धरण क्षेत्रात १२२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोदेधरणातून १२३१ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दुपारी दोनच्या सुमारास गगनबावडा -कोल्हापूर या प्रमुख राष्ट्रीय मार्गावरील कोदे फाटा व मांडुकली या दोन ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. पावसाचा असाच जोर कायम राहीला तर रात्री उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.









