अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित खाली उतरवलं; छत्तीसगड राज्यातील देवरत केवात असं तरुणाचे नाव; शाहूपुरी पोलिसांनी घेतलं ताब्यात
आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावरील सुमारे ३५ फूट उंच विद्युत खांबावर परप्रांतीय तरुण चढल्याने या परिसरात असणाऱ्या नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर अग्निशामन दलाच्या जवानांनी या तरुणाला या खांबावरून सुरक्षितपणे खाली उतरवलं आणि शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यामुळे या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निष्वास सोडला.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण अचानक धावत आला आणि रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या 35 फूट खांबावर चढून खांबावर उभा राहिला यावेळी रस्त्यावरून येजा करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरोड करून त्या तरुणाला उतरण्यास सांगितले मात्र या तरुणांना मला काही गुंड मारत आहे त्यामुळे मी खाली येणार नाही असं सांगितल.त्यामूळे नागरिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली . यानंतर अग्निशामक दलाच्या ताराराणी फायर स्टेशनचे अधिकारी दस्तगीर मुल्ला नवनाथ साबळे फायरमन विजय सुतार संभाजी ढेपले आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे जवान आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढत त्याला सुरक्षितपणे खाली उतरवलं दरम्यान या घटनेमुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्याचबरोबर वाहनांची देखील कोंडी झाली. या तरुणाने आपलं नाव देवरत केवात असल्याचं सांगितलं असून तो मूळचा छत्तीसगड राज्यातील सक्ती इथं राहणारा असल्याची माहितीही त्याने दिलीय. सांगली जिल्ह्यातील विटा इथं कॅनॉल बांधकाम कामगार करत असल्याचं पोलिसाना सांगितलय . हा तरुण मनोरुग्ण असल्याची चर्चा देखील या ठिकाणी सुरू होती. सध्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी या तरुणांकडून अधिक माहिती घेत आहेत.









