जिल्ह्यात ५० ठिकाणी नाकाबंदी
नाकांबदीच्या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझरीची व्यवस्था
कोल्हापूर
नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. सगळीकडे ३१ डीसेंबरच्या सेलिब्रेशनची तयारी जोरदार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये आणि या स्वागताच्या जल्लोषी वातावरणाला गालबोट लागू नये, म्हणून कोल्हापूर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.
३१ डीसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५० विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अॅनालायझरची व्यवस्था केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
“सर्वांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना कायद्याचं पालन करावे. कोणीही हुल्लडबाजी करू नये. मद्यपान करून वाहन चालवू नये, आणि स्वतः व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १ पोलीस अधिक्षक, १ अप्पर पोलीस अधिक्षक, ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, ८० अधिकारी, ७०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे आणि नवीन वर्षाचे स्वागत करावे”, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.








