शिरोळ प्रतिनिधी
ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या शिरटी हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेले संशयित शिक्षक निलेश बाळू प्रधाने यांना शाळेत हजर करून घेऊ नये या मागणीसाठी शिरटी हायस्कूल समोर भर पावसात शाळेसमोर ग्रामस्थांची शिक्षकाविरोधात जोरदार निदर्शने करून त्याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. ज्ञानदीप शिक्षण संस्थेने त्या शिक्षकाला पाठीशी घातल्यास शाळेलाही कुलूप ठोकू असा इशारा शिरटीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
अधिक वाचा- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषीस ५ वर्षाची सक्तमजूरी
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, २० फेब्रुवारी २०२० रोजी सानिका माळी हिला शाळेत पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर विषबाधा झाली होती. त्यानंतर उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शाळेतील शिक्षक प्रधाने यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांची जामीनवार सुटका झाली असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तो पुन्हा शाळेत दिनांक ८ जुलै रोजी हजर झाला. प्रधाने शाळेत हजर झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ आक्रमण झाले रविवारी ग्रामस्थांनी संस्थेच्या संचालकांसह गाव सभा घेऊन सोमवारी कोणत्याही परिस्थितीत त्या शिक्षकाला शाळेत येऊच द्यायची नाही, असे ठरवले त्यानुसार आक्रमण होऊन शेकडो नागरिक सकाळी दहा वाजता शाळेसमोर उपस्थित झाले. मात्र तो शिक्षक सोमवारी सकाळी शाळेत हजर झाला नाही. त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्याचा प्रतीकात्मक पुतळा दहनमाजी सरपंच प्रकाश उदगावे राममोंडा पाटील सचिन खोबरे रामदास भंडारे अभय गुरव यांची भाषणे झाली शिक्षक हजर होईल याहेतुने गावातील पालक ज्येष्ठ नागरिक यांनी भर पावसात शाळेसमोर उभे राहुन होते.
दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक अजित खवाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर राहणार आहोत संशयित शिक्षक शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन शाळेत आला होता. शिक्षक शाळेत आल्याची माहिती ग्रामस्थाना कळताच असंतोष पसरला. शाळेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने आम्ही दुःखी असून ग्रामस्थांच्या बरोबर राहणार आहोत. याबाबत कायदेशीर सल्लामसलत सुरू असून या निकाला विरोधात शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आले आहे. तसेच त्यास निलंबित करून शिक्षण संस्थेच्या वतीने त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची त्यांनी बोलताना दिली. उद्या देखील गावातील नागरिक सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.
दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक अजित खवाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “संबंधित शिक्षक शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन शाळेत आला होता. शाळेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने आम्ही दुःखी असून आम्ही ग्रामस्थांच्या बरोबर आहोत. याबाबत कायदेशीर सल्लामसलत सुरू असून या निकालाविरोधात शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आले आहे. तसेच त्यास निलंबित करून शिक्षण संस्थेच्या वतीने त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची त्यांनी बोलताना दिली.”