19 वयोगटासह खुल्या व दुहेरीत अजिंक्यपद : महिलांमध्ये जान्हवी गोळे विजेती
प्रतिनिधी/कोल्हापूर
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि माधुरी बेकरीचे संस्थापक (कै.) अनंतराव रंगाप्पा वडगावकर यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अनिश सोनटक्केने 19 वर्षाखालील गटासह खुल्या व दुहेरी गटात अजिंक्यपद मिळवत तिहेरी मुकूट संपादन केला. महिलांच्या गटात जान्हवी गोळे यांनी विजेतेपद संपादन केले.
केएसएसच्या हॉलमाध्ये ही स्पर्धा 3 4 व 5 जून दरम्यान झाली. स्पर्धेत सहा वयोगटापासून सत्तर वयोगटापर्यंतच्या अशा एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन माधुरी बेकरीचे श्री दत्त वडगावकर, रोटरीचे अध्यक्ष डॉ. मेघराज चुघ , सेक्रेटरी कुशल राठोड यांच्या उपस्थितीत झाले. बक्षीस वितरण समारंभ माधुरी बेकरीचे चंद्रकांत वडगावकर व डॉ. मेघराज चूघ यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अभिजीत हावळ, अजिंक्य कदम, राजेंद्र पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन डॉ. अभिजित हावळ व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनचे श्री संग्राम चव्हाण व प्रमुख पंच सचिन कोग्नेळे, सुरेश देशपांडे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे : विजेते व उपविजेते
11 वर्षांखालील गट – मुले : जुनेद मगदूम, संकल्प बंदिवडेकर, मुली ः तनव्ही चव्हाण, अवनी माने.
13 वर्षांखालील गट – मुले : मैत्रेय कळमकर, इशान माने, मुली ः आर्या आराध्ये, सारा पठाण.
15 वर्षांखालील गट – मुले : केतन सुतार, मैत्रेय कळमकर, मुली ः निहाली पाटील, अनन्या जोशी,
17 वर्षांखालील गट- मुले : देव बकरे, पिनाक पाटकर, मुली ः निराली पाटील, अनन्या जोशी.
19 वर्षांखालील गट – मुले : अनिश सोनटक्के, अव्दैत बोंद्रे, मुली ः हर्षदा लाड, सुहानी कुराडे.
खुला गट – पुरूष : अनिश सोनटक्के, अव्दैत बोंद्रे, महिला- जान्हवी गोळे, हर्षदा लाड.
पुरूष दुहेरी : अनिश सोनटक्के व श्रेयस माने, ऋषिकेश नलवडे व देव बकरे.









