कबनूर वार्ताहर
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून यास वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी व्यवस्था व्हावी या मागणीसाठी कोल्हापूर येथे तिळवणी आमरण उपोषण सुरू आजचा चौथा दिवस असून अद्यापही या वरती कोणताही तोडगा निघालेला नाही.योजनेवरील विद्युत पुरवठा व्यवस्था जोवर होत नाही तोवर हे उपोषण चालूच राहणार असा गावकऱ्यांनी निर्धार करून या सर्वस्वी जबाबदार शासनच राहील अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. दरम्यान एकाची प्रकृती गंभीर असून त्यास हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.भागाचे लोकप्रतिनिधी अधिकारी व शासनाने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा व गावच्या पाण्याचा प्रश्न निकाली लावावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तिळवणी (ता.हातकणंगले) येथील राष्ट्रीय पेजल नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज कनेक्शन जोडणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या कार्यालयासमोर १ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा तिळवणी ग्रामपंचायतने निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांना दिलेला आहे. त्यानुसार मंगळवारी एक मार्च रोजी गावचे सरपंच राजेश पाटील व उपसरपंच दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्यावतीने कोल्हापूर येथे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू झाले.
तिळवणी तालुका हातकणंगले येथे गावामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत नवीन नळपाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत.पंचगंगा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जॅकवेलमध्ये मोटरपंप बसविण्यात आलेली आहे.मोटर पंप ठेवण्याकरिता जागा उपलब्ध असल्याचे पत्र तिळवणी गावास दिलेले आहे.या ठिकाणी तसेच गावातील साठवण टाकीत जलशुद्धीकरण केंद्राकरिता नवीन वीजकनेक्शन मागणी केली आहे.गेली दीड वर्षापासून ग्रामपंचायत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही देखील अद्यापही वीज जोडणी करून दिलेली नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौदा गाव योजनेचे मागील थकबाकी दोन कोटी,बावन्न लाख,एक्कावन हजार,आठशे ऐंशी रुपये इतकी आहे.
वीज मंडळाकडून हे कारण वारंवार पुढे करून हे बिल भरल्याशिवाय वीज कनेक्शन देता येत नाही.असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.थकबाकी ही चौदा गावांची मिळून आहे.एकट्या तिळवणी गावची नाही.त्यामुळे तिळवणी गावास तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.गावातील महिलांचे पाण्याविना हाल होत आहेत. महिलांचे व नागरिकांचे होत असलेले हाल याची दखल घेऊन गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेस नवीन वीज कनेक्शन जोडणी बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.अन्यथा १ मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर तिळवणी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषण उपोषणास बसत आहेत,असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यापूर्वी याबाबत अनेक वेळा अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन चर्चा केली,निवेदने दिले तरी देखील यावरती निर्णय न घेतल्याने आज तिळवणी गावावर ही वेळ आली आहे.मागील थकबाकी साठी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा करण्यास मंजुरी देत नाहीत.संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून पाणी योजनेसाठी गावाला वीज पुरवठा करून देण्यास भाग पाडावे असे सरपंच यांनी सांगितले.
आमदार राजू बाबा आवळे,माजी आमदार राजीव आवळे, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अधीक्षक अभियंता कोल्हापूर कार्यकारी अभियंता इचलकरंजी सह संबंधितांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत. गुरुवारी एक मार्चपासून कोल्हापूर येथे आमरण उपोषण चालू आहे गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक गावकरी यामध्ये सामील होत आहेत असे असताना आजचा चौथा दिवस आहे. पूर्ण असलेल्या या योजनेस वास्तविक पाहता विद्युत वितरण कंपनीकडून विज जोडणी द्यायला हवी होती मात्र वीज कंपनीकडून मागील बाकी भरण्याचा सबब पुढे केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.योजना पूर्ण असूनही देखील योजनेवरील पाणीपुरवठा गावाला सुरळीत व्हावे यासाठी विद्युत पुरवठा अध्यापन केल्यामुळे आमरण उपोषण सारखे पाऊल उचलण्याची वेळ गावकऱ्यावर आली आहे.अध्यापि यावरती तोडगा निघालेला नाही.
दरम्यान ,उपोषण स्थळे एका नागरिकाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तेव्हा जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकाळी तात्काळ लक्ष देऊन ताबडतोब ब विद्युत पुरवठा करण्यास भाग पाडावा व हा विषय निकालात काढावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.सरपंच राजेश पाटील, उपसरपंच दीपक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी यामध्ये सहभागी झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









