बीआरएस पक्षाने आपल्याला मुख्य़मंत्रीपदाची ऑफर दिलेली होती असा खळबळजनक खुलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज कोल्हापूरात बोलत होते.
कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “गेले अनेक महिने केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष आमच्या संपर्कात आहे. त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफऱ दिली होती.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी केसीआर यांनी अनेक ऑफर ठेवल्या असल्याचे सांगताना ते म्हणाले, “त्यांनी ही ऑफर देताना म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्य़ांसाठीचा चेहरा शोधत असून तुम्ही आमच्या पक्षात सामिल व्हा. तुमचा चेहरा समोर ठेऊन निवडणूक लढवू. तुम्हाला मुख्यमंत्री करू. त्यासाठी तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. आम्ही तुम्हाला केंद्रीय कोअर कमिटीचे सदस्यपदही देऊ” असे ते म्हणाले. त्यांची ही ऑफर नाकारताना आम्ही कधीच आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीच विसर्जित करणार नाही असेही ते म्हणाले.








