वारणानगर, प्रतिनिधी
Kolhapur News : वारणा नदीवरील बच्चे सावर्डे – मांगले दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावर सावर्डेच्या ता.पन्हाळा बाजूचा रस्त्याचा भराव खचल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. तरी प्रवाशांनी सावधानता बाळगावी अशा सूचना पोलीस पाटलांनी दिल्या आहेत. तसेच या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वारणा नदीवर सावर्डे -मांगले दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याचे गतवर्षी बर्गे घालण्यास असलेल्या गेटचे नूतनीकरण करण्यात आले आहे. बंधाऱ्यावरील कॉक्रेट रस्ता तयार करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. बंधार्या वरून सावर्डे ता.पन्हाळा ते मांगले ता.शिराळा सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ग्रामीण मार्ग आहे त्यामुळे या मार्गावर सततची वाहतुक चालू आसते.
वारणा नदीला आलेल्या पूरात गेली काही दिवस सावर्डे -बंधारा व बाजूचा रस्ता पाण्याखाली गेला होता. दोन दिवस पाऊसाचा जोर ओसरल्यावर बंधार्यावरील पाणी कमी झाले आहे. सावर्डेकडच्या बाजूचा रस्त्याचा पूर्ण भराव खचून गेल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. प्रवाशांनी या मार्गावर येवू, नये चार चाकी दुचाकीस्वारांनी रस्ता दुरुस्त होत नाही तो पर्यंत प्रवास करू नये असे आवाहन पोलीस पाटील सागर यादव यानी केले आहे.
सावर्डे -मांगले सुमारे चार ते पाच कि.मी.चे आंतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्गच राहीला आहे. हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग होण्याची गरज असून, बंधारा ते सावर्डे गावापर्यन्त गेली काही वर्ष रस्ताच झालेला नाही. त्यामुळे प्रवाशी नागरिक त्रस्त आहेत. पंचायत समिती पन्हाळा व जिल्हा परिषद कोल्हापूर बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या मार्गाची आवस्था दयनीय झाली आहे. या धोकादायक मार्गावर रस्त्याच्या पडलेल्या खंदकामुळे आपघाताची दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.









