प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूरची श्री अंबाबाई आणि नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. यामुळे ही दोन शहरे विमानसेवेने जोडली जावीत अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्याकडे केली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली.कोल्हापूरची अंबाबाई तर नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा ही महत्वाची धार्मिक स्थळे आहेत.या दोन्ही ठिकाणी भाविक मोठया संख्येने प्रवास करतात.यामुळे या मार्गावर विमानसेवा सुरु होण्याची गरज आहे.चव्हाण यांनी नांदेड-मुंबई व मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा ट्रूजेट ऐवजी इंडिगो किंवा एअर इंडियासारख्या कंपनीकडे सोपवण्याची मागणी केली आहे.यावेळी मंत्री सिंदीया यांनी सकारात्मक भूमिका घेत त्याकडे लक्ष देण्याचे आश्वासन चव्हाण यांना दिले.
सद्या कोल्हापूरातून तिरुपती, अहमदाबाद, हैदराबाद या मार्गावर विमानसेवा सुरु आहे. तर 13 जानेवारी पासून बंद पडलेली कोल्हापूर- बेंगलोर या मार्गावरही विमानसेवा सुरु होणार आहे.
Previous Articleअन् अणुस्कुरा घाटाची पायवाट दिसु लागली
Next Article भारत, यजमान दक्षिण आफ्रिका एकाच गटात









