शहरातील नाले सफाईचा बटय़ाबोळ झाल्याचा शहर व जिल्हा कृती समिती आणि मनपा अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीतून समोर आले आहे. बुधवारी पाचव्या दिवशीही पाहणी मोहीम सुरू होती. पार्वती टॉकीजसह पाच नाल्यांची पाहणी केली. यावेळी नाले सफाई झाली नसल्याचे दिसून आले.
कृती समितीने बुधवारी पार्वती टॉकीज शेजारील व एम. जे. मार्केटमधून वाहणारा नाला, कब्रस्थानमार्गे गवत मंडई ते कुंभार गल्लीमध्ये जाणारा नाला, बसंत बहार टॉकीज शेजारील स्केअर 9 इमारत शेजारून वाहणारा नाला, केव्हीज पार्क, कलेक्टर ऑफीस जवळून पश्चिम दिशेला राजहंस प्रिंटींग प्रेस मार्गे नदीकडे जाणारा नाला, सासने ग्राऊंड पासून ट्रेड सेंटरच्या पिछाडीस व कलेक्टर ऑफीस पिछाडीस वाहणारा नाला यांचीं पाहणी केली. येथील एकाही नाल्याची सफाई केली नसल्याचे दिसून आले. 2019 व 2021 मध्ये याच नाल्यांमुळे त्या परिसरात पाणी तुंबले होते. घरात दुकानात घूसले होते. रस्त्यावरची वाहतूक थांबली होती. यामधील काही नाले विकसकांनी सोयीस्कर वळवले असून नाल्यांची रूंदीही कमी केली आहे.
स्वच्छतेच्या फलकाजवळील नाल्यात घाणीचे साम्राज्य
2022 चे मोठे फलक रंगविले आहेत. येथीलच नाले घाणीने राजहंस प्रिंटींग प्रेस जवळील नाल्याच्या दोन्ही बाजूच्या सुरक्षा कठडयावर कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान रंगवलेले आहेत.
कर्मचाऱ्यांना खोरी, घमेली मिळेनात
वास्तविक पावसाळ्याच्या आधी पोकलँड मशिन किंवा जेसीबीने साफ करून घेणे अनिवार्य होते. त्यासाठी कर्मचाऱयांकडे खोरी, घमेली, लोखंडी पाहार असे साहित्य गरजेचे होते. परंतु भंडार विभागाकडे 1700 घमेली, 1700 खोरी, व लोखंडी पाहरा संबंधित खात्याला मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव धुळखात पडून आहे.
Previous Articleजमीन घोटाळय़ांवर आता एसआयटी!
Next Article Kolhapur; कोवाड येथील खुनाचा चोवीस तासात तपास









