कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेच्या नगररचना विभागाने (टिपी) दोन दिवसाच्या विशेष कॅम्प घेतला. यामध्ये 67 बांधकाम परवानगी देण्यात आल्या. यामध्ये शुक्रवारी दिवसभरात 33 बांधकाम परवानगी, 6 भोगवटा प्रमाणपत्र, 2 विभाजन व 2 गुंठेवारी प्ररकणे मंजूर केली.
नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. दोन दिवसात 67 बांधकाम परवानगीसह 26 भोगवटा प्रमाणपत्र, 13 विभाजन, 2 बांधकाम परवानगींना मुदतवाढ व 7 गुंठेवारी प्ररकणे मंजूर केली. भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर केली. सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली.









