कोल्हापूर :
कोल्हापूर महानगर पालिकेने घरफाळा चालु आर्थिक वर्षात विक्रमी 4.81 कोटीची वसुली केली असुन गत वर्षी पेक्षा यावर्षी पालीकेला 17 कोटीचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेकडून प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या सुरुवाती पासुनच 100 टक्के होण्यासाठी वारंवार नगररचना आणि इतर विभागातील अधिक्रायाची बैठक घेऊन आढावा घेत होत्या.
कोल्हापूर महानगर पालिकेकडून थकबाकी असण्राया मिळकत आणि नळ कनेक्शनधारकांना नोटिसा लागू करण्यास सुरुवात केली होती. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नगर रचना विभागाकडून 94.48 कोटी ची विक्रमी वसुली केली असुन घरफाळा विभागाकडून 78 कोटी पाणीपट्टी विभाग 56 कोटी,इस्टेट विभाग 14 कोटी,पाणी पट्टी 56 कोटी,परवाना विभाग 2.82 कोटी तर एलबीटी चे शासना कडून 204 कोटी असे एकूण 4.81 कोटी ची भर पालीकेच्या तिजोरीत पडली आहे.
या करवसुलीसाठी पालिके कडून विविध पथके नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान, गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 17 कोटीची वाढ झाली आहे. नुसत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात वर्षासाठी 707 कोटी 64 लाख रुपयांचे महसुली उत्पन्नाचे उदिष्ट गृहित धरले असून येत्या वर्षात यातील 707 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च होणार आहेत. मनपा तसेच पाणी पुरवठा विभागाची 224 कोटी 94 लाख भांडवली जमा तर खर्च 224 कोटी 77 लाख रुपये गृहीत धरला आहे. शासनाच्या विविध विशेष योजनांतून 360 कोटी 22 लाख रुपये तर वित्त आयोगाकडून 42 कोटी असे महसुली, भांडवली आणि विशेष प्रकल्प तसेच वित्त आयोग मिळून 1334 कोटी 76 लाख रुपयांचे सादर झाले आहे.
- नव्या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट
यंदाच्या वर्षी एलबीटी 235 कोटी, मिळकत करातून 101 कोटी, मार्केट भाडे 42 कोटी, इतर संकीर्ण जमा 90 कोटी, शासकीय अनुदान 7 कोटी, नगररचना शुल्कातून 91 कोटी, परवानगा फी 5 कोटी, आरोग्य विभाग 4 कोटी, पाणी पुरवठा विभागाकडून 87 कोटी तसेच जललाभ करातून 4 कोटी असे एकूण 707 कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न महापालिकेने अर्थ संकल्पात गृहीत धरले आहे. तर यातील आस्थापना, पेन्शन, मानधन आदीवर 368 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच कार्यालयिन खर्चावर 11 कोटी असे मिळून उत्पन्नातील 53 टक्के खर्च पगार आणि व्यवस्थापणावरच खर्च होणार. सिंचन पाणी पट्टी 10 कोटी, प्राथमिक शिक्षण 64 कोटी, रस्ते दुरूस्तीसाठी 8 कोटी, संगणकीकरण 1 कोटी 80 लाख, पाणी तूट भरपाई 23 कोटी, ड्रेनेज देखभाल 18 कोटी, विद्युत खर्च 59 कोटी, इतर खर्च 77 कोटी, केएमटी अर्थसहाय्य 16 कोटी असे 707 कोटी 64 लाख रुपये नव्या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट आहे.








