प्रतिनिधी, राहुल गडकर
Kolhapur: कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सध्या कोल्हापूर महानगरपालिका राज्यात चर्चेच्या स्थानी आली आहे. रस्त्यांमुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागल्याचे बोलले जात असताना महानगरपालिका रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात गडबडीने कामाला लागली. सोमवारी फुलेवाडी रिंग रोडवरील खड्डे बुजवले असतानाच आज मंगळवारी सकाळी पुन्हा तेच खड्डे उकरण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे एका खड्ड्याची दुसरी कहाणी म्हणत कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभाराची चर्चा परिसरात रंगली आहे.













