मिरज-कोल्हापूर नवीन हायवेवर अपघात
मिरज / प्रतिनिधी
मिरज-कोल्हापूर नवीन हायवेवर भरधाव चारचाकीने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. बजरंग सुदाम कांबळे (वय 45 इचलकरंजी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सदरचा अपघात हा बुधवारी रात्री 9 वाजता झाला. अपघात एवढा भीषण होता की मयत कांबळे याचा मृतदेह जवळपास शंभर मीटर अंतरावर फेकला गेला होता.
बुधवारी रात्रीच्या सुमारास नवीन झालेल्या कोल्हापूर मिरज राष्ट्रीय महामार्गजवळ (MH 24-V-498) कारने (MH09-AY-2168) या मोटारसायकलस्वराला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील बजरंग कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अपघातानंतर चारचाकी चालक गाडी सोडून पळून गेला होता. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला.









