कोल्हापूर/प्रतिनिधी
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग वरील किनी टोल नाक्याची मुदत संपूनही वसुली सुरू असलेल्या नाक्यावर मनसेने आज पुन्हा आंदोलन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मनसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना मनसेच्या राज्यभरातील आंदोलनामुळे ६५ टोलनाके बंद झाल्याचे म्हटले होते. या मुद्द्याला कोणत्याही राजकीय पक्षाने हात घातलेला नाही. मात्र मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांनी काल भाषणात म्हणाले होते.
दरम्यान, राज्यात अद्यापही काही ठिकाणी टोल नाके सुरू असून हे टोलनाके बंद करण्यासाठी मनसे आक्रमक होत आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाका (Kini toll plaza) बंद करण्यात यावा यासाठी आज मनसेच्या वतीने टोल नाक्यावर जोरदार राडा घालण्यात आला. मुदत संपलेले असतानाही टोल वसुली करत (Kolhapur MNS Protest Against Toll Plaza) असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत टोल वसुली थांबवा, अशी मागणी यावेळी केली आहे. यावेळी पोलीस आणि मनसैनिकांमध्ये झटापट झाली. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली आहे.