गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये मॕकजय (प्लॉट नं. डी 33) या औषध तयार करणाऱ्या कंपनीमध्ये अज्ञात व्यक्तीने टेरेस वरील दरवाजा उघडून 19 लाख 95 हजार किमतीचे औषधी साहित्य लंपास केले. ही घटना शनिवार दिनांक 28 ते 29 जानेवारी दरम्यान घडली असून या घटनेची नोंद 31 जानेवारी रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे .
याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीमध्ये पाच लाख 50 हजार रुपये किमतीचे फिलिंग मशीन ,चारशे मिली चे सिरींज व आठ नग असेंबली व त्याचे नोझल्स व नटबोल्ट, दोन लाख रुपये किमतीचे लॉस पंपाचे इन पिलर दोन नग ,सत्तर हजार रुपये किमतीचे बॅलन्सिंग वजन डिजिटल दहा नग, दहा हजार रुपये किमतीचे बंकर 173 किलोग्रॅम चे झाकण एक नग ट्रान्सफॉर्मर चे झाकण, एक नग स्टेनलेस स्टीलच्या 13 बाय 13 इंचाचे प्लेट्स 49 नग ,सेकंडरी पॅकिंग मधील स्टीलचा टेबल एक नग, लिस्ट पॅकिंगचे चेंज पार्ट्स सहा नग, वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर्स दहा नग, लॅरीवेशन 10 सेट असे एकूण 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा मल चोरी झाल्याची फिर्याद कंपनी मालक मोहन मधुकर मुल्हेरकर( वय 74 ) रा. सिल्वर ओक , रेसिडेन्सी पार्क कोल्हापूर यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिले आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि अविनाश माने करीत आहेत.