Kolhapur Market Committee Election : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया सुरु असून गुरुवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणार असणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तब्बल 609 जणांनी माघर घेतली. दोन्ही पॅनेलचे मिळून 36 उमेदवार वगळता अन्य 15 उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात आहेत.दरम्यान आज शिव शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या आघाडीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) हे पक्ष सहभागी आहेत.
खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर , भाजपा जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरूडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासो पाटील आसुर्लेकर, प्रा जयंत पाटील, विजय देवणे,संजय पवार,सुनिल मोदी, नाथाजी पाटील, राहुल देसाई,प्रा.सुनिल मगदूम ,प्रा.शहाजी कांबळे ,हंबीरराव पाटील,संभाजी आरडे यांच्या उपस्थितीत आघाडीचे उमेदवार जाहीर केले.

जाहीर केलेल्या एकूण उमेदवारांची नावे
विकास सेवा संस्था गट-७
१) रणजीत वसंतराव पाटील-रा,चुये ता. करवीर (भाजप महाडिक)
२)बाजीराव सदाशिव पाटील रा.वडणगे ता. करवीर (शिवसेना नरके)
३)किरण गोविंद पाटील रा.महे ता. करवीर (शिवसेना नरके)
४)सुरेश आनंदा पोवार रा.सातार्डे ता. पन्हाळा (शिवसेना ठाकरे)
५)अर्जुन महादेव चौगुले रा.पोर्ले ता,पन्हाळा (राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर)
६)प्रताप भैरु मेंगाणे रा.बामणे ता.भुदरगड (भाजप राहूल देसाई)
७)बळवंत सदाशिव पाटील रा.चंद्रे ता.राधानगरी (भाजप राहूल देसाई)
महिला प्रतिनिधी
१)कविता शाहू चव्हाण रा.द वडगाव ता. करवीर (भाजप महाडिक)
२)अरुणा अशोक पाटील रा.पाडळी बु ता.करवीर (शिवसेना नरके)
इतर मागासवर्ग
अनिल श्रीकृष्ण वायकुळ रा.आंबा ता.शाहूवाडी,
सत्यजित पाटील आबा-शिवसेना ठाकरे
भटक्या विमुक्त जाती
२)मधुकर गणपती पाटील (रा.मोरेवाडी.ता.भुदरगड) भाजप राहूल देसाई
ग्रामपंचायत सदस्य गट
१)संजय दत्तात्रय जाधव रा हणमंतवाडी ता करवीर (शिवसेना नरके गट)
२)सुरेश शामराव पाटील रा. पिरळे ता. शाहूवाडी (शिवसेना ठाकरे सत्यजित पाटील आबा )
३) समाधान नारायण म्हातुगडे रा.सोनाळी ता. कागल(भाजप राजे समरजितसिंह घाटगे गट)
४)उत्तम रामचंद्र कांबळे रा.गोरंबे ता. कागल (आरपीआय आठवले गट)
अडते व व्यापारी
१)नंदकुमार आनंदराव वळंजू रा.कोल्हापूर शिवसेना राजेश क्षीरसागर
२)अमर विलासराव क्षीरसागर रा.कोल्हापूर शिवसेना राजेश क्षीरसागर
तोलाई व हमाल
१)राजाराम आबाजी जगताप रा.कुराडवाडी ता.पन्हाळा (शिवसेना ठाकरे सत्यजित पाटील आबा )









