Samarjitsinh Ghatge On Hasan Mushrif : आपण नेतृत्व उत्तम करू शकतो असं काही लोकांचा समज आहे.पक्ष बाजूला ठेवून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. 25 वर्षात बाजार समितीत काय केले? कोणते बदल केले? केवळ घोषणाचा बाजार केला,सत्ता असताना बाजार समितीत 25 वर्षे काय केले? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना केला. केवळ गुळाचा सौदा करण्यासाठी बाजार समिती नसल्याचे ही ते म्हणाले. शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी यांनी आज पत्रकार परिषद घेतली घेत विरोधकांवर टीकेची झोड उठवली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, बाबासाहेब पाटील असुर्लेकर उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणात कट्टर शत्रु बनलेले भाजप-शिवसेना आणि ठाकरे गटाने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काल हात मिळवणी केली.राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि आरपीआयचे उत्तम कांबळे यांना सोबत घेत त्यांनी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची घोषणा केली.गुरुवारी शासकीय विश्रामगृह आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात जागा वाटपा संदर्भात झालेल्या पाच ते सहा तासांच्या चर्चेनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.मात्र आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शिवसेना ठाकरे गट सत्ताधारी आणि विरोधी पॅनेल मधून बाहेर पडल्याची माहिती पत्रकार द्वारे दिली.

दरम्यान, काल आमदार हसन मुश्रीफ यांनी जागा वाटपा दरम्यान शिवसेना ठाकरे गटाची जागा थेट माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना जाहीर केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अन्य नेत्यांचे म्हणणे जाणून घेतले नाही. आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या सोयीचे राजकारण पाहत माजी आमदार घाटगे यांना जागा जाहीर केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी यांनी केलायं.,









