Kolhapur Market Committee Election : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान असणार आहे. समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणार आहेत. समितीच्या चार मतदार संघासाठी 70 केंद्रांवर मतदान होत आहे. मतदानासाठी 480 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना सोबत घेत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची तर भाजप-शिवसेना आणि ठाकरे गटाने राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि आरपीआयचे उत्तम कांबळे यांना सोबत घेत शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे. या दोन आघाड्यांमध्ये खरी निवडणुक होणार आहे.70 मतदान केंद्रांवर मतदान होणार विकास संस्था गटात 36 केंद्रे, ग्रामपंचायत गटात 29 केंद्रे, व्यापारी गटात तीन केंद्रे आणि हमाल तोलाई गटात एकूण दोन केंद्रअशा एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी रविवार 30 रोजी होणार आहे.