शाहुवाडी प्रतिनिधी
गर्दीच गर्दी चोहीकडे, लावा गाडी कोणी इकडे शोधा वाट इकडे तिकडे या उक्तीचा प्रत्यय मलकापूरच्या बाजारपेठेत गुरुवारी आला .माणसापेक्षा गाड्यांची संख्या अधिक झाल्याने बाजारपेठेत चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती.
मलकापूर बाजारपेठ पंचक्रोशीतील आबाल वृद्धांचे मुख्य ठिकाण ‘प्रत्येक नागरिक खरेदीसाठी मलकापूर बाजारपेठेत येत असतो. मात्र मलकापूर बाजारपेठेत वाहन तळच अधिक झाल्याची चर्चा आणि वास्तव चित्र गुरुवारी दिसून आलं . गौरी आणण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य व अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. मात्र माणसं कमी आणि गाड्याच जास्त असे चित्र दिसू लागल .वाट काढताना अनेक वेळा कसरत करूनच वाट काढावी लागत होती . दू चाकी ,चार चाकी वाहनांनी पूर्ण बाजारपेठ काबीज केली. लहान मुलं वृद्ध नागरिकांना मात्र या संकटाचा चांगलाच सामना करावा लागला.
येत्या दोन दिवसात आणखी गर्दी वाढणार याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ बाजारपेठेत योग्य शिस्त लावावी अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांच्यातून व्यक्त होऊ लागली आहे .