शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथील सार्थक प्रशांत तानवडे वय 16 या युवकाचा ‘पाण्यात पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे .नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या या युवकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सार्थक तानवडे हा कोळगाव उचत दरम्यान असलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी मित्रांच्या समवेत पोहायला गेला होता . दरम्यान त्या पाण्यात तो पोहत असताना बुडाला ‘आपला मित्र पाण्यात बुडाल्याची माहिती सोबत असलेल्या मित्रांनी नागरिकांना दिली.
यावेळी घटनास्थळी लक्ष्मण खाके या युवकासह नागरिकांनी धाव घेऊन त्याचा पाण्यात शोध घेतला . यावेळी तो त्या ठिकाणी सापडून आला . मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .शांत संयमी सार्थकसार्थक तानवडे यांने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे . स्वभावाने अत्यंत शांत ,संयमी व सर्वांसी प्रेमाने वागणारा व मित्र परिवारांचा आवडता असणारा सार्थक या दुर्दैवी घटनेत मृत्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .









