सरपंच व सदस्य पदाच्या सहा जागांवर बाजी; २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; जनतेने विकासकामांना दिले प्राधान्य
कोल्हापूर/ प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर जय हनुमान परिवर्तन आघाडीने सरपंच पदासह सदस्य पदाच्या ७ पैकी ६ जागांवर निर्विवाद यश संपादन करून २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. माजी सरपंच सीताराम सातपुते, गवळदेव दूध संस्थेचे संस्थापक संजय मोरे, वरिष्ठ पत्रकार कृष्णात चौगले, सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलची भक्कम बांधणी झाल्यामुळे जनमताचा सकारात्मक कौल मिळाला.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उद्योगपती अशोक नारकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी जय हनुमान आघाडीविरोधात जय हनुमान परिवर्तन आघाडीने (काँग्रेस,जनसुराज्य, चेतन नरके गट) शड्डू ठोकला. माजी सरपंच सीताराम सातपुते, कृष्णात चौगले, सुदर्शन पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची दखल घेत जनतेने परिवर्तन आघाडीला साथ दिली.निवडणुकीमध्ये जाहीर केलेला वचननामा पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही नूतन सरपंच शारदा पाटील यांच्यासह सदस्यांनी दिली.
विजयी सदस्यांची नावे
प्रभाग क्र.१
दीपाली राहुल पाटील,सुनीता लखू कापसे
प्रभाग क्र. २
राजेंद्र वसंत महाजन, स्वाती कृष्णात चौगले.
प्रभाग क्र. ३.
सीताराम चंदर सातपुते,अश्विनी राजेंद्र सातपुते (जय हनुमान आघाडी)
अडीच वर्षानंतर स्वाती चौगले यांना सरपंच पद
परिवर्तन आघाडीत निश्चित झालेल्या फॉरमुल्यानुसार अडीच वर्षानंतर सदस्या स्वाती चौगले यांना सरपंच पद दिले जाणार आहे.









