शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूर शहर व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मलकापूर शहर प्रमुख अजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मारुती मंदिर समोर हनुमान चालीसा पठण करून महाआरती करण्यात आली यावेळी मनसेचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते महाआरती झाल्यानंतर मनसे पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हनुमान चालीसा पठण व महाआरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मलकापूर येथील मारुती मंदिरासमोर महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आली. या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर ‘सहकार सेनेचे अध्यक्ष सतीश तांदळे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे, बाळासाहेब कदम, प्रवीण कांबळे, डॉ. संजय गांधी, रमेश पडवळ, महेश विभूते, उत्तम शिंगटे, चेतन गुजर, रूपेश वारंगे, यांच्यासह मनसे व हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.