उष्म्यामुळे मतदान केंद्रावर मतदानाला अल्प प्रतिसाद, गवा संवर्धनासाठी फेजीवडे मतदान केंद्रावर गवाथीम व सेल्फी पॉइंट
राधानगरी/ प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी राधानगरी शहरासह फेजीवडे, पडळी, कारीवडे, दाजीपूर, ओलवन, सो शिरोली, कुडुत्री , सावर्धन सह तालुक्याच्या पश्चिम भागात सकाळच्या सत्रात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे तर दुपारी साडेबारा पर्यत 32 टक्के मतदान झाले असून तालुक्यात 27 टक्के मतदान नोंदले आहे,काही गावात कडक उन्हामुळे मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसून येत आहे.

मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिक व महिला यांना ने – आण करण्यासाठी कार्यकर्तेच्या कडून वाहनांची सोय करण्यात आली होती, तर काही ठिकाणी अल्पपोहारची व्यवस्था केली होती, तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने फेजीवडे येथील मतदान केंद्रावर राधानगरी गवा अभयारण्य असलेली गव्याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती तर सेल्फी पॉइंट व स्वागत कमान उभारण्यात आली आहे, तर दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर उपलब्ध तसेच पहिल्यांदा मतदार यादीत समावेश असलेल्या नवंमतदारांनी एकत्र येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तालुक्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन तहसीलदार अनिता देशमुख व गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी यांनी केले आहे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








