मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणूकीसाठी मोर्चाबांधणी सुरु असतानाच विधानपरिषदेच्या निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. एकूण १० जागांवर ही निवडणूक होणार असून, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह इतर आमदारांची मुदत संपल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होत असून, २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत आणि २० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेपाठोपाठच विधानपरिषदेचा बिगूल वाजल्याने येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. राज्यातील मातब्बर आमदारासह १० आमदारांची मुदत २२ जुलै रोजी या संपत आहे. तत्पूर्वी २० जूनला २० जूनला मतदान होणार आहे.