कोल्हापूर- गगनबावडा मार्गे कोकणाला जोडणारा रस्ता बालिंगा पुलावर बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. महे- बीड पुलावरती पाणी आल्याने त्या भागातील वाहतूक या पुलावर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भोगावती नदीवर बालिंगा गावच्या हद्दीत असणाऱा हा पूल खूप जुना आहे. या पुलावर कोल्हापूरातील करवीर, पन्हाळा गगनबावडा या तालुक्यातील लोकांचे दळणवळण होत असते. याशिवाय कोल्हापूरला कोकणला जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते.
केल्हापूर गगन बावडा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू असून ते पावसामुळे ठप्प झाले आहे. या जुन्या पुलावरील ताण कमी करण्यासाठी पुलाला समांतर नविन पुल प्रस्तावित असून त्याचे काम प्राथमिक स्थितीत आहे. त्यातच महे- बीड पुलावरती पाणी आल्याने त्या भागातील वाहतूक कुंभी कासारी कारखाना मार्गे या पुलावरुन जात असल्याने पुलावरील ताण वाढला आहे. पूल जुना असून नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा निर्णय घेतला आहे.