कसबा बीड/ प्रतिनिधी.
कोगे तालुका करवीर येथे दत्त मंदिर या ठिकाणी श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर या संस्थांना मार्फत ज्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला जातो, त्याच पद्धतीने कोगे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दीपोत्सवाच्या नियोजनामध्ये मंडळाचे कार्यकर्ते व गावातील तरुण युवक वर्ग महिला व भक्त भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रथमदर्शनी मंदिराकडे प्रवेश करण्याच्या ठिकाणी गल्लीतूनच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी व देशाच्या उन्नतीसाठी या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रत्येक ठिकाणी दीप लावत रांगोळी काढत सुरुवात करण्यात आली. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून दत्त मंदिर कोगे रांगोळी व फुलाच्या माध्यमातून नाव लिहून पालखी सोहळ्याचे चित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व क्रांतिवीरांचे फोटो व त्यासमोर दीप लावून त्यांना मंडळातर्फे आदरांजली व्यक्त करण्यात आली.
तरुण पिढीला आदर्श घेणार सारखे या दीपोत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आले. कोणत्याही कार्यासाठी भूत वर्तमान व भविष्य याचा विचार करून वाटचाल केली पाहिजे हा संदेश जणू या मंडळाच्या केलेल्या उपक्रमातून आलेल्या सर्व भाविकांना देण्यात आला होता. या दीपोत्सव कार्यक्रमांमध्ये श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन कशा पद्धतीने केले पाहिजे ? व जीवन कशा पद्धतीने व्यतीत करायचे, हा संदेश सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचला गेला असे म्हटले तरी वांवगे होणार नाही. बाळेकुंद्री संस्थान मध्ये ज्या धर्तीवर विविध उपक्रम केले जातात त्याच धर्तीवर कोगे येथे विविध उपक्रम साजरे केला जातात. म्हणूनच कोगे गावास बाळेकुंद्री संस्थान मार्फत मिनी बाळेकुंद्री असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर भजनी सेवा मंडळ, युवक वर्ग, कोगे गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत चे सर्व मान्यवर, महिला, आबाल वृद्ध, व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.