एन.पी. फिश कंपनीने शाखेच्या उद्घाटना निमीत्त दिली भेट
वारणानगर / प्रतिनिधी
कराड येथील एन पी फिश कंपनी शाखा – वारणा – कोडोलीच्या आज रक्षाबंधन निमीत्ताने ठेवलेल्या उद्घाटन सोहळ्यास बंधू भगिनींना प्रत्येकी एक किलो मोफत मासा यामाध्यमातून दीड मे.टन मासा भेट देण्यात आला याचा तीन हजार बंधू भगिनींनी लाभ घेतला.
वारणा – बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली ता.पन्हाळा येथील एमएसईबी फाट्याजवळ आज एन पी फिश कंपनी कराड यांची ४ थी शाखा सुरू करण्यात आली आज बुधवार दि. ३० रोजी रक्षाबंधन होते जे बंधू – भगिनी एकत्र येथील त्यांना बोंबील प्रकारातील एक किलो मासा मोफत भेट देण्यात आला. मोफत माशाचा स्वाद रक्षाबंधन निमित्ताने मिळणार असल्याने दिवसभर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
समुद्री व इतर असे ४० हून अधिक प्रकारचे ताजे मासे दैनदिन ग्राहकांना उपलब्द होणार अजून माशाचा या नव्या दालनाने परिसरातील खवय्यांना मोठी सेवा उपलब्द झाल्याचे कंपनीचे संचालक सुनिल पाटील,अमिर नदाफ यानी सांगीतले.
एन पी फिश कंपनी कोडोली शाखेचे व्यवस्थापक रामचंद्र पाटील,सौ. भारती पाटील, गणेश पाटील,सौ.सिमा पाटील,दिनेश पाटील,सौ. स्वरूपा पाटील यानी ग्राहकांचे स्वागत करून आभार मानले.









