वारणानगर / प्रतिनिधी
जालना अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलीसांनी अमानुष लाठीहल्ला केला या झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ कोडोली सह परिसरात आज मंगळवार दि.५ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.
येथील सर्वोदय चौकात सकाळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच व्यापारी बांधव एकत्रित ऐवून निषेध व्यक्त करणेत आला. आंदोलकांच्या वर झालेला लाठीहल्याचा निषेध व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व व्यापारी बांधवानी दुकाने बंद ठेवून पाठिबा दिला. या बंदमध्ये अगदी भाजीपाला विक्रेत्यांनी ही सहभाग घेतल्याने बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता . राज्य परिवहन मंडळाची एसटी सेवेसह खाजगी वहातूक बंद होती.
सर्वोदय चौकात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत परीसर दणाणून गेला. यावेळी अमरसिंह पाटील , राहूल पाटील, जयदीप पाटील, संजय निकम, बाबासो पाटील वीरेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सुनिल पाटील, विलास पाटील यांच्यासह व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी व मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातवे येथे सकल मराठा तर्फे पुकारलेल्या बंदला उत्फुर्स प्रतिसाद
मिळाला यादरम्यान गावातील सर्व व्यवहार, सरकारी कार्यालये, हायस्कूल, शाळा यांनी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, यावेळी अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व गावे बंद मध्ये सहभागी झाली होती.
यावेळी मोहन पाटील, दत्ता चव्हाण, विकास पाटील, ऋषी खामकर, राज इंगवले, सागर पाटील, अभि नरुटे,भैय्या आंब्रे, बबलू गोरड इ. सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते









