आठवा वर्धापन दिन उत्साहात, मान्यवरांच्या सदिच्छा भेटी
वारणानगर / प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या कोडोली शाखेच्या ( Lokmanya Multipurpose Cooperative Society ) माध्यमातून कोडोलीसह परिसरातील जनतेला विविध सेवांच्या माध्यमातून लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन लोकमान्यचे कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी केले. विविध मान्यवरांनी सदिच्छा भेटी देऊन व्यवस्थापनास शुभेच्छा दिल्याने ८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.
कोडोली ता. पन्हाळा येथील लोकमान्य शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्यचे जेष्ठ संचालक गजानन धामणेकर, क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील, सहाय्यक व्यवस्थापक आर.डी. पाटील यांनी ग्राहकांशी संवाद साधला.
लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूह सल्लागार संपादक किरण ठाकूर (Kiran Thakur) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली या चार राज्यातील संस्थेच्या २१३ शाखांच्या माध्यमातून ८००० हजार कोटी रुपये ठेवी पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरु असून कर्जे, विमा यासह अन्य सेवेचा लाभ ग्राहकांना वेळेत दिला जात असल्याने स्थापनेपासून आजवर सर्वच स्तरावर ग्राहकांच्या विश्वासामूळे संस्थेची प्रगती झाली आहे. कोडोली शाखेत या आठ वर्षात १५ कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट पार होत आल्याचे दिलीप पाटील यांनी सांगून लोकमान्य संस्थेने स्थापनेपासून विविध उपक्रम राबवत ग्राहकांना तसेच ठेविदारांना चांगला लाभ दिला आहे विमा सारख्या सेवा च्या माध्यमांतून ग्राहकांना भरघोस मदत केली आहे कोडोली व परिसरातील जनतेने देखील लोकमान्यची सेवा पाहून चांगला प्रतिसाद दिला आहे प्रत्येक वर्षी ठेवी, विमा ,पर्यटन व विविध ग्राहक उपयोगी सेवेस प्रतिसाद वाढत आहे असे सांगितले.
कार्यक्रमास शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी,कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड,कोडोलीतील विविध सहकारी संस्थांचे जेष्ठ मार्गदर्शक जी.ए.पाटील आप्पा, ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, प्रकाश पाटील, कोडोली अर्बण बँकेचे चेअरमन राहूल पाटील, शाहू पतसंस्था मोहरे चे मॅनेजर भानुदास शेळके,विठ्ठल ग्रामीण पतसंस्था कोडोली चे अशोक लाडगांवकर, विलासराव कोरे पतसंस्थेचे चेअरमन व वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव कापरे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन राहूल पाटील,कोडोली नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. मेनकर, बहिरेवाडीचे विक्रमसिंह जाधव, ताराराणी पत संस्था कोडोली चे कर्मचारी कोडोलीतील कृष्णराव जमदाडे, एम.जी.पाटील, डॉ.सुनिल कोळेकर, डॉ.अनुसूधा सुर्यवंशी आंबवडे चे भाऊसाहेब मोहिते, योगेश पायमल,यासह विविध संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव,व्यवस्थापक, संचालक, अधिकारी, कर्मचारी, वृत्तपत्र विक्रते झाकीर जमादार, सचिन सोनटक्के,ठेवीदार व इतर ग्राहक यांनी भेटी देऊन संस्थेस शुभेच्छा दिल्या. लोकमान्यांच्या कोडोली शाखेत कर्मचारी सौ. अर्चना पाटील, अभिजीत पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा विधी पार पडले. शाखाधिकारी मानसिंग मोहिते, उपशाखाधिकारी अमोल चव्हाण,हिम्मत भोसले,अविनाश मोरे,कृष्णात मोरे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.









