भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होण्याची गरजमरळी येथून काँक्रीटीकरणाचे काम सुरु
कृष्णात चौगले कोल्हापूर
कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुपरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. या रस्त्यासाठी खासगी मालकीची सुमारे 4 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. महसूलसह अन्य संबंधित विभागाकडून ही प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होण्यासाठी आणखी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पार पडल्यास एप्रिल 2024 पर्यंत रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रोजेक्ट मॅनेजर अविनाश मरजीवे यांनी दिली.
जालना येथील व्ही.पी.सेट्टी कंपनीकडून हे काम सुरू आहे. दुपरीकरण करताना सध्याच्या रस्त्यामध्ये कळंबा, भामटेसह अन्य गावांनजीक असणारी वळणे काढली जाणार आहेत. अशा ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच बालिंगा येथे होणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करताना एका बाजूस शासकीय जमीन असली तरी दुसऱ्या बाजूस खासगी जमीन आहे. या जमिनीचे तत्काळ भूसंपादन होणे आवश्यक आहे. हा रस्ता 16 मीटरचा होणार असल्यामुळे फुलेवाडी ते बालींगा दरम्यान अनेक ठिकाणची बांधकामे काढावी लागणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार असून त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे कंपनीकडून प्रथम मरळी येथून रस्ते कामास सुऊवात केली आहे. दुपरीकरणाच्या या कामामध्ये कोठेही उ•ाण पूल होणार नाही. या रस्त्यावरील चढ-उतार काढले जाणार असल्यामुळे ज्या ठिकाण पूर्वीचा रस्ता सखल आहे, तेथे थोडा भराव टाकून रस्त्याची समान उंची केली जात आहे. त्यामुळे मरळी पुलाच्या पुर्वेकडील सखल भागात रस्त्याची उंची थोडी वाढवली आहे.
गावहद्दीत 1 मीटरचे काँक्रीट गटर
गावहद्दीतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गावाशेजारी 1 मीटर ऊंदीचे काँक्रीट गटर्स बांधले जाणार आहे. यामध्ये कळे गावहद्दीत 1 किलोमीटरचे मरळी 550 मीटर, भामटे 700 मीटर, कोपार्डे 500 मीटर, बालिंगा 550 मीटर तर फुलेवाडी हद्दीत 1540 मीटरचे गटर बांधले जाणार आहे.
अनेक वाहन चालकांकडून पर्यायी रस्त्यांचा वापर
कोल्हापूर-कळे रस्त्याच्या दुपरीकरणाचे काम सुऊ असताना या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी अन्य पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला आहे. एका बाजूने हा रस्ता केला जात असून दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवली आहे. तरीही या अऊंद मार्गावरून वाहतूक करणे गैरसोयीचे ठरत आहे. गाळप हंगाम सुऊ झाल्यानंतर या मार्गावरून ऊस वाहतूक करणारे टॅक्टर आणि ट्रकची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांनी आपल्याला सोयीस्कर ठरणाऱ्या पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची गरज आहे.
आठवड्याभरात रस्त्याच्या डागडुजीचे काम होणार पूर्ण
कोल्हापूर-कळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असले तरी सध्या वाहतूक सुऊ असलेल्या जुन्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच रस्त्यावर ज्या ठिकाणी मोहरींचे काम झाले आहे, अथवा सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. शासन नियमानुसार महामार्गाचे नवीन काम करताना वाहतूक सुऊ असणारा रस्ता हा ख•sविरहीत आणि वाहतुकीसाठी योग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे दुपरीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीकडूनच कळे येथून रस्त्यावरील मोठे ख•s भरण्याचे काम सुऊ आहे. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण होईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्त्यावरील ख•यांमुळे अपघातांची मालिका
तळकोकणाला जोडणारा रस्ता म्हणून कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ओळखला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुऊ आहे. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे ख•s पडले असून रस्ते अपघातामध्ये गेल्या चार महिन्यांत सुमारे पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या ख•यांसह लहान ख•s भरून घ्यावेत अशी वाहनचालकांची मागणी आहे.
रोज 250 मीटरचे काँक्रीटीकरण
मरळी येथून रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या एक पट्टयाचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मानांकनाप्रमाणे हे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज सुमारे 250 मीटरच्या काँक्रींटीकरणाच्या पहिल्या थराचे काम सुरू आहे. सध्या 2 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कोपार्डे पर्यंत पहिल्या थराचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मरळी येथून रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूचे काँक्रीटीकरण सुरू केले जाणार आहे. यामध्ये भामटे गावानजीकचा सुमारे 150 मीटरचे वळण काढले जाणार आहे. सध्या मोहऱ्यांचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पाच फुटांची स्वतंत्र मोटरसायकल लेन
अपघात होऊ नयेत यासाठी दक्षता म्हणून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दीड मीटरची मोंटरसायकल लेन (पट्टा) केली जाणार आहे. या लेनमधूनच दुचाकीस्वारांनी प्रवास करणे बंधनकारक राहणार आहे. तर रस्त्याच्या मध्ये पांढरा रंगाचा पट्टा मारला जाणार आहे.









