Kolhapur Jotiba Road Cracked : दोन वर्षानंतर यंदा नवरात्रोत्सव मोठ्य़ा प्रमाणात साजरा केला जाणार आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूर-जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचला आहे. या रस्त्याला खूप खोल आणि रुंद भेगा पडल्या आहेत. कोणत्याही क्षणी रस्ता तुटून जाण्याची भीती आहे. यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.
महाराष्ट्र- कर्नाटकातून अनेक भाविक नवरात्रोत्सवात कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर जोतिबाला जातात. कोरोन निर्बंध उठल्यानंतर यंदा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी कोल्हापूर-जोतिबाला येणार. दरम्यान कोल्हापूर-जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारी म्हणून रस्ता आधीच वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. नवीन पद्धतीने रस्ता बांधून सुद्धा सलग तीन वर्षे रस्ता खचण्याचा सिलसिला सुरुच आहे.
Previous ArticleKolhapur : दर्शनरांग भवानी मंडपातूनच
Next Article जिल्हय़ात लम्पीचा धोका वाढला









