Kolhapur Jaggery Market Yard Closed : शाहू मार्केट यार्ड गूळ बाजारपेठेत आज पुन्हा गूळ सौदे बंद पाडले.काल सायंकाळपासून गुळाचे सौदे बंद करण्यात आले आहेत. ५० टक्के मजुरी वाढच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. परिणामी यंदाच्या गूळ हंगामात दोन महिन्यांत दुसऱ्यांदा गूळ सौदे बंद पडले. त्यामुळे सौदे बंदची टांगती तलवार कायम आहे.दरम्यान, बाजार समितीने काल सायंकाळी पाच वाजता माथाडी कामगारांची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला;मात्र माथाडी कामगार मागणीवर ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली.त्यामुळे आज पुन्हा गुळ सौदे बंद पाडले.
५० टक्के मजुरीवाढीवर माथाडी ठाम
माथाडी कामात गूळ रव्यांची भरणी उतरणी,तोलाई,पॅकिंग,थप्पी लावण्यासाठी मजुरी दर माथाडी बोर्ड,बाजार समितीने निश्चित केले आहेत.त्यानुसार ३० किलोच्या रव्यांसाठी ६ रुपये ५८ पैसे सध्या मजुरी मिळते.यात ५० टक्के वाढ करावी,पुढील तीन वर्षांसाठी वाढ असावी,अशी मागणी माथाडींनी केली आहे. ही मागणीची अवास्तव असून, ती मान्य करणे अशक्य असल्याचे व्यापाऱ्यांसह सर्वांनी सांगितले.त्यामुळे बैठकीत तोडगा निघाला नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









