शाळा-महाविद्यालय, विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळतय प्रशिक्षण; गणपती आरासमधूनही देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कोल्हापूर प्रतिनिधी
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मातीचे सीड गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण शाळा-महाविद्याल आणि विद्यापीठातून दिले. स्वत:च्या हाताने तयार केलेल्या गणपतीची घरात प्रतिष्ठापना करण्याचा आग्रह विद्यार्थी करीत आहेत. काही कुटुंबांनी आपल्या मुलाने-मुलीने बनवलेल्या मातीच्या गणपतीची घरात प्रतिष्ठपना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मानस केला आहे. तर काही कुटुंबियांनी घरातील गणपतीशेजारी मुलांनी तयार केलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यास पसंदी दिली आहे. एकूणच पाणी, ध्वनी, हवा प्रदूषण रोखून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गणेशोत्सवातून देण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी शाळा-महाविद्यालये अनेक उपक्रम राबवत असतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक शाळा-महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागाने विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध आकाराचे गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या कौशल्याचा वापर करून सीड गणपती, शाडूच्या मातीचा आणि कागदाच्या लगद्याचा गणपती तयार केला आहे. या गणपतींना पाना-फुलांपासून तयार केलेले कलर दिले आहेत. यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व पर्यावरण संवर्धनाची दूरदृष्टी दिसून येते. या गणपतीचे विसर्जन पाण्यात, कुंडीत किंवा शेतात केल्यास प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घेत गणपती तयार केले आहेत.
माती, फळ, फुलांच्या बियांपासूत गणेशमूर्ती तयार केली आहे. गणेश विसर्जनादिवशी या गणेशमूर्तीचे विसर्जन शेतात किंवा कुंडीत करून पाणी प्रदुषण रोखण्याचा, विद्यार्थ्यांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. बाजारात शाडूमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणशेमूर्तींना दिलेले रासायनिक कलर पर्यावरणाला हानीकारक आहेत. त्यामुळेच पर्यावरणपूरक गणेशमुर्ती तयार करून प्रदूषण रोखण्याचा शाळा-महाविद्यालय, सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. भविष्यात या प्रशिक्षणातूनच पर्यावरण संवर्धनाची चळवळ वाढीस लागेल असा विश्वास शिक्षकांकडून व्यक्त केला जातोय. गणेश आगमन आणि विसर्जन पारंपारिक वाद्यांच्या गजरात करण्याचा सल्लाही शाळांमधून दिला जात आहे. गणेमूर्ती तयार करण्याचा अगळा-वेगळा अनुभव आल्याच्या भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. फुल, फळांच्या बियांपासून तयार केलेल्या गणपतीची घरात प्रतिष्ठापना करून पाच दिवस पूजा-आर्चा करणार आहेत. तसेच घरातील कुंडीत, शेतात गणपतीचे विसर्जन केल्यास गणपतीच्या आशिर्वाद म्हणून ही फुले, फळे, झाडे कायमस्वरूपी आपल्या घरात, शेतात राहतील असा संदेशही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिला आहे.
काहीलीत गणेशविसर्जन करण्यासाठी शाळा-महाविद्यालये आग्रही
पाणी प्रदूषण रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक काहीलीमध्ये गणेशविसर्जन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आग्रही आहेत. घरगुती गणेशविसर्जना दिवशी चौका-चौकातील आणि नदी, तलावाच्या परिसरातील काहीलींमध्ये गणेशविसर्जन करण्यास भाविकांना आग्रह करतात. त्यामुळे काहीलीत विसर्जन करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूणच पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याकडे जनतेचा कल वाढला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








