पंचायत समिती आरक्षण गारगोटीत जाहिर
गारगोटी प्रतिनिधी
भुदरगड पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये 4 गणांमध्ये महिलांना संधी मिळाली तर 4 ठिकाणी पुरूषांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत. सकाळी दिनकरराव जाधव सभागृहात ही सोडत पार पडली. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील दाखले खुल्या वर्गातील इच्छुकांच्याकडे असल्याने सभागृहात आरक्षणावेळी उत्साही वातावरण जाणवत होते.
सर्वसाधारण पुरूष- 2, सर्वसाधारण महिला- 3 तर नागरिकाचा मागास प्रवर्ग 2 ठिकाणी तसेच अनुसुचित जातीसाठी 1 अशा जागा आरक्षित झाल्या.
गारगोटी व पुष्पनगर येथील पंचायत समिती जागा ओबीसी महिलासाठी राखिव झाली, मडिलगे व पिंपळगांव सर्वसाधारण पुरूषांसाठी आरक्षित झाल्या, याचबरोबर सर्वसाधारण महिलासाठी मठगांव कूर व आकुर्डे, अनुसुचित जातीसाठी कडगांव असे आरक्षण जाहिर झाले. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी ही आरक्षणे जाहिर केली.
यावेळी परिवीक्षाधिन उपजिल्हाधिकारी श्रध्दा उदावंत, निवासी नायब तहसीलदार डॉ. सुशांत कांबळे, गटविकास अधिकारी शिरिष भोकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे, पंडितराव केणे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय देसाई, माजी सभापती बापुसो आरडे, संजय गांधी निराधार योजना सदस्य संग्राम सावंत, अजित चौगले, पी. एस. कांबळे, रवी जाधव, नेताजी आरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.