kolhapur Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळीच पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत पोहचले असून, गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी- 37 फुट 8 इंच असून, पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फुट आहे. तर धोका पातळी 43 फुट इतकी आहे. आतापर्यंत एकुण 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर पाऊस तर सर्वात जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात 105 मिलिमीटर पाऊस झालेला आहे.पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील सात कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 29 लोकांचं स्थलांतर झाले असून,13 जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील 54 घरांचे नुकसान झाले आहे.
आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पुढीलप्रमाणे
-वैभववाडी गगनबावडा कोल्हापूर हा राष्ट्रीय मार्ग बंद
-जिल्ह्यातील आठ राज्यमार्ग आणि 17 जिल्हा मार्ग बंद तर 24 ग्रामीण मार्ग बंद
-आत्तापर्यंत 29 लोकांचं स्थलांतर आणि 13 जनावरे सुरक्षित स्थळी
– पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील सात कुटुंबांचे स्थलांतर
-येळाणे, कोपार्डे, शिरगांव, सवते, शिंपे, सरूड,शिरगांव मठ ते सवते येथे रस्त्यावर २ फूट पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
-येळाणे शाहूवाडी बांबवडे मार्गे सरूड पर्यायी मार्ग सुरु करण्यात आला आहे.
-चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने त्या ठिकाणी चंदगड मधून हेरे, इब्राहिमपूर, पारगड हा वाहतूक मार्ग बंद आहे.








