प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Weather Update : सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मंगळवारी सायंकाळी देखील जिल्ह्याच्या बहुतांशी भागास वळीव पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे जिह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्यासह झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे त्या मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहक तारा तुटल्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. दिवसभरातील उष्म्यानंतर सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पुढील दोन दिवस जिह्यात वळीव पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. पण दूपारी तीन नंतर आकाशात ढग जमू लागले. सायंकाळी साडेपाच नंतर ढगाळ वातावरण तयार होवून पावसाचे विरळ थेंब पडत होते. त्यानंर सायंकाळी सहाच्या सुमारास काळे ढग एकत्र दाटून आले आणि जोरदार पावसास सुऊवात झाली. पावसानंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला. शहरातील लक्ष्मीपूरी व्यापार पेठ, व्हिनस कॉर्नर चौक, राजारामपुरीतील जनता बझार चौक, फोर्ड कॉर्नर, कोषागार कार्यालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, परिख पूल आदी सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बाजार भोगावपैकी मोताईवाडी येथे कोसळली वीज
सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसादरम्यान बाजार भोगावपैकी मोताईवाडी येथे जनावरांच्या शेडवर वीज कोसळल्यामुळे शेडच्चे नुकसान झाले आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यासह जनावरे जखमी झाली आहेत.
हातकणंगलेत धान्य गोदामाचे पत्रे गेले उडून
वादळी वाऱ्यामुळे हातकणंगले येथील शासकीय धान्य गोदामाचे 20 पत्रे उडून गेले. याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने दखल घेऊन उडून गेलेले पत्रे तत्काळ बसविण्यात आले.
Previous Articleनात्याला काळीमा; भावाकडून गतिमंद बहिणीवर अतिप्रसंग
Next Article शिराळा बायपास रोडवर ४८ तासांहून अधिक वेळ लाईट बंदच









