आरोग्यसेवेसाठी डॉक्टरच घरी येणार
संग्राम काटकर कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईच्या भाविकांच्या पोटाला चार घास देणाऱ्या ताराबाई रोड, मित्र प्रेम मंडळासमोरील श्री अंबाबाई भक्त मंडळाने आता आरोग्यदूत म्हणून कार्यरत राहण्याचे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या गरीब घरात लहान मुल-मुली अशक्त आहेत, ताप अथवा अन्य विकारांसाठी वारंवार आजारी असतात, त्यांच्या घरी डॉक्टरांना पाठवून उपचार केले जाणार आहेत. आरोग्य तपासणीत आढळून येणाऱ्या विकारांनुसार चांगल्या प्रकाराची इंजेक्शन व औषधे दिली जाणार आहे. मात्र त्याच्या बदल्यात मुलांच्या कुटुंबाकडून कोणतेही शुल्क मंडळ अथवा डॉक्टरांच्या टीमकडून घेतले.
एक सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच वर्षापासून श्री अंबाबाई भक्त मंडळ अंबाबाईच्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालवत आहे. ताराबाई रोड, मित्र प्रेम मंडळाच्यासमोरील इमारतीत रोज सुऊ राहणाऱ्या अन्नछत्राचा अनेक भाविक लाभ घेत आहेत. अन्नछत्र चालवत चालवतच मंडळाने गोरगरीब कुटुंबीयांकडील हजारो ऊपयांची बचत होईल, असे समाजाभिमुख कार्यही हाती घेतले आहे. ते असे की, ज्या इमारतीच्या जागेत सध्या अन्नछत्र सुऊ आहे, ती जागा गरीब कुटुंबीयांना घरगुती कार्यक्रमासाठी मोफत देण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात दहा ते बारा कार्यक्रम अन्नछत्रस्थळी झाले आहेत. अंबाबाईच्या भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून गेल्या जुलै महिन्यात भाविक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. मोफत स्वऊपात झालेल्या या शिबिरात तीनशेहून अधिक भाविकांसह त्यांच्या लहान मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली होती. या शिबिरातूनच भविष्यातील एक व्हिजन म्हणून मंडळाने आरोग्यदूत म्हणून कार्यरत राहण्याचे पक्के केले.
ज्या ज्या गरीब घरातील लहान मुले-मुली अशक्त आहेत. या ना त्या विकारांमुळे वारंवार आजारी पडतात. पैशाअभावी त्यांच्यावर चांगले उपचार होत नाहीत, अशा कुटुंबाचा आर्थिक ताण कमी करण्याचे मंडळाने ठरवले. आजारी मुला-मुलींना आपल्या न बोलावता त्यांच्याच घरी जाऊनच उपचार करण्याचेही पक्के केले. त्यासाठी अगदी उलीकडचे डॉ. प्रमोद बुलबुले (रा. भोई गल्ली, बिंदू चौक), डॉ. महादेव सुतार (रा. दसरा चौक), संदीप देवाळकर (रा. रंकाळावेस) या बालरोगतज्ञ डॉक्टरांची टीमही तयार केली आहे. या टीमने विना मोबदला आरोग्यसेवा देतानाच आजारी मुला-मुलींच्या घरात जाऊन उपचार करण्याचे नियोजन केले आहे. त्यांना गरजेनुसार इंजेक्शन व गोळ्याही दिल्या जाणार आहेत. पुढील तपासणी केव्हा याचीही माहिती आजारी मुला-मुलींच्या पालकांना दिली जाणार आहे. ही बहुमोल आरोग्यसेवा यशस्वी झाल्यास गरीब कुटुंबात वाढणारी नवी पिढी एक सशक्त पिढी म्हणून नावाऊपाला तर येईल, शिवाय त्यांच्या पालकांचा सोसावा लागणार आर्थिक ताणही बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
मंडळांना आवाहन…
लहान मुलांवरील उपचारासाठी केस केपर करण्यापासून ते इंजेक्शन, गोळ्यांसाठी मोठा खर्च येतो. हा खर्च सर्वच गरीब कुटुंबांना करणे अशक्य असते. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून अंबाबाई भक्त मंडळाने मुला-मुलींसाठी मोफत आरोग्यसेवा देण्याचे व्रत स्वीकारले आहे. ही आरोग्यसेवा देताना डॉक्टरांची टीम आपल्या जवळचे औषधे देणार आहे. पण जी मुलं सतत आजारी असताना त्यांना मोठ्या दवाखान्यातील उपचार देण्यासाठी पैशाची चणचण भासणार आहे. ती भऊन काढण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तेव्हा इच्छूक मंडळांनी मदत देण्यासाठी मित्र प्रेम मंडळासमोरील अंबाबाई भक्त मंडळाशी संपर्क साधावा.
संजय साळोखे (अध्यक्ष- अंबाबाई भक्त मंडळ)