राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसूली संचलनालयाने (ED) छापे टाकले. कागल आणि पुण्यात असेलेल्या मुश्रिफ यांच्या मालमत्तांवर ह् कारवाई झाली. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त होऊन पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.तसेच या कारवाईचा निषेध केला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या गोष्टिचा निषेध करून केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कोणीही कारवाई करू नये, अस माझं स्पष्ट मत असल्याचे म्हटले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आमदार हसन मुश्रिफ यांच्यावर झालेले आरोप चुकिचे आणि राजकिय सूडबूद्धीतून झाले आहेत. संजय राउत आणि अनिल देशमुखांवर यांच्यावर देखिल नाहक आरोप झाले आहेत. त्यातून काहीही निष्पण्ण झाले नाही. सत्ताधाऱ्यांनी सरकार लोकशाही मार्गाने चालवणे अपेक्षित असून सूडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे आहे” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या अगोदर आमच्या बरोबर असणारे सत्ताधाऱ्यांबरोबर गेल्यावर म्हणत आहेत कि, आता कारवाई होत नाही. तपास यत्रणांकडून काही विशिष्ठ पक्षावरच आणि ठराविक लोकांवरच कारवाई का केली जाते. महाराष्ट्रात काम करणाऱ्या एजन्सीजना चौकशी करण्याचा अधिकार असला तरी या चौकशीला राजकिय रंग आहे का याची शंका येते. मूळ शिवसेनेतील म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेले काही आमदार जसे कोकणातील आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक, आणि विदर्भातील आमदार नितीन देशमुख यांच्याही मागे चौकशी लावली गेली आहे.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








