आचारसंहिता लागू; 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायतीं (थेट सरपंचसह सदस्य पदासाठी)चा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये जिह्यातील 89 ग्रामपंचायती व 48 ^ग्रामपंचायतमधील 72 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरवात होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार शुक्रवारी (दि.6) तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे. 16 ऑक्टोंबरपासून 20 ऑक्टोंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुऊ राहणार आहे. 23 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजल्यापासून छाननी प्रक्रिया होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया 25 ऑक्टोबरला दुपारी 3 पर्यंत असणार आहे. याच दिवशी दुपारी 3 नंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप होऊन उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी 6 नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित होणार आहे.
जिह्यातील 89 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक
तालुका ग्रामपंचायत संख्या
चंदगड 21
पन्हाळा 04
करवीर 08
आजरा 03
भुदरगड 02
राधानगरी 03
गडहिंग्लज 05
शिरोळ 04
हातकणंगले 04