समाजकार्यात उत्साही असणारा उद्योजक अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का
गोकुळ शिरगाव वार्ताहार
गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील प्रतिष्ठित उद्योजक व गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशन (गोशिमा) चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अजित बिंदाप्पा अझरी (वय 63) यांचे बुधवार दिनांक 25 रोजी दुपारी निधन झाले. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये गेल्या 35 वर्षापासून मायक्रोटेक इंडस्ट्रीज या नावाने त्यांचे फर्म असून ते गेले 35 वर्षे या ठिकाणी काम करत आहेत.
उद्योगाबरोबरच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने अजित आजरी हे नाव एमआयडीसी परिसरात चांगले चर्चिले जात होते. गोशिमाचे ते सलग वीस वर्षे संचालक असुन 2011 ते 13 त्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती तर पुन्हा एकदा त्यांच्या कामाची दखल घेऊन 2014 ते 15 यावेळी सुद्धा त्यांना चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती .दोन वेळ त्यांनी गोशिमा चेअरमन पद संभाळले होते . फाउंड्री क्लस्टर मध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. उद्योगाबरोबरच सर्वसामान्य छोटे-मोठे व्यवसायिक यांच्याबरोबर सुद्धा त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुतुहल होते. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला आहे. आजरी यांचे गोकुळ शिरगाव मध्ये मायक्रोटेक इंजिनियर्स ,हायटेक इंजिनिअर व मायक्रोटेक इंडस्ट्रीज अशा तीन फर्म असून या तिन्ही ठिकाणी त्यांचे काम चालू आहे .आजरी यांच्या मागे दोन मुले, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.









