Kolhapur Gayran Encroachment : गायरान मधील अतिक्रमण कायम करावेत, यासाठी 2022 च्या आदेशाची अंमलबजावणी करावी,अतिक्रमण काढण्यात आल्यास आम्ही गप्प बसणार नाही.याबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.काही चुकीचे झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल,असा थेट इशारा माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला.गायरान अतिक्रमण काढण्याविरोधात आज सर्वपक्षीय मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील 2 लाख यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील 22 हजार गायरान अतिक्रमण कायम करण्यासाठी आज कोल्हापुरात सर्वपक्षीयच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.हजारो कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते.माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गायरान मधील अतिक्रमण कायम करावीत यासह,अतिक्रमण काढणाऱ्या आदेशाला सुप्रीम कोर्टातून राज्य सरकारने स्थगिती मिळवावी,अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.यावेळी कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील,माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,आमदार ऋतुराज पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे,संजय पवार,गोकुळचे संचालक चेतन नरके,माजी आमदार चंद्रदीप नरके,रिपाईचे प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा- गायरान कोणत्याही परिस्थितीत काढू देणार नाही-सतेज पाटील
यावेळी चंद्रदिप नरके म्हणाले की, अतिक्रमण होण्यापूर्वी ते रोखले पाहिजे, से न्यायालयाचे स्टेटमेंट आहे.मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.नंतर त्या ठिकाणी अतिक्रमण झाले.गोरगरिबांची घरे तिथं वसली गेली.आता जर त्या ठिकाणी अतिक्रमण काढायला गेलात तर रक्तरंजित होईल,बळजबरीने अतिक्रमण काढायला जाऊ नका,अन्यथा आमच्या रोशाला सामोरे जावे लागेल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुर्नयाचिका दाखल करण्यास सांगितले आहे.मात्र यातून मार्ग न निघल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे चंद्रदिप नरके यांनी स्पष्ट केलं.
राज्यसरकारने गोरगरिबांची मागणी मान्य करावी.गायरान अतिक्रमण विरोधात महामोर्चा काढण्याचा इशारा देताच,सत्ताधाऱ्यातील नेत्यांनी याचिका दाखल करण्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केलं.मात्र आज जी गर्दी झाली हा ट्रेलर आहे,पिक्चर अभी बाकी है.गायरान अतिक्रमाला हात लावायचा असेल तर अगोदर ऋतुराज पाटील यांच्या केसाला धक्का लावा.असे थेट आव्हान आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले.
गायरान महामोर्चा Live पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
नरके साहेब मुख्यमंत्र्यांच्याकडे न्याय मागा
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भर सभेत माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा चिमटा काढला.नरके साहेब तुम्ही शिंदे गटासोबत असता,तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन बसा आणि याबाबत न्याय मागा,असा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला.
2022 च्या जीआरची अंमलबजावणी करा,गावठाणची हद्दवाढ करा, अशी मागणी आम्ही सत्तेत असताना केली होती.मात्र हे निर्णय करण्याची इच्छा राज्य सरकारची असली पाहिजे.राज्य सरकारने याचं राजकारण करू नये याबाबत सकारात्मक निर्णय झाला पाहिजे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे.आम्ही अतिक्रमण केलेले नाही आम्ही भूमीहीन आहोत,ही आमची हक्काची जागा आहे.प्रशासनाला ठणकावून सांगा,अतिक्रमण काढण्यास आलं तर आम्ही कोणीही गप्प बसणार नाही,असं थेट आव्हान माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारला दिले.
न्यायालयात गोरगरिबांची बाजू न घेतल्यामुळेच आज ही वेळ गरिबांवर आली आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारने कायदे बदलले आहेत.तर गरिबांसाठी कायदे बदल करा,अन्यथा गोरगरीब जनता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
काय आहेत मागण्या?
-गायरानमधील अतिक्रमण कायम करावीत.
-2019 पूर्वीची अतिक्रमण कायम करावीत.
-अतिक्रमण काढणाऱ्या आदेशाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती आणावी
Previous Articleऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात नो एंट्री
Next Article मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!









