कोल्हापूर
गडहिंग्लज ही फुटबॉलची पंढरी आहे. खेळाडूंची इच्छा होती याठिकाणी फुटबॉल मैदान व्हावे. त्यानुसार गडहिंग्लज मध्ये अत्याधुनिक क्रीडासंकुल उभा केले जाणार आहे. पुण्यातील बालेवाडीच्या धर्तीवर होणाऱ्या या क्रीडा संकुलला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तीन टप्प्यांमध्ये 50 कोटी खर्च करून जवळपास साडे दहा एकर मध्ये हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
पहिल्या टप्यात फुटबॉल मैदान आणि जॉगिंग ट्रॅक होणार आहे. दुसऱ्या टप्यात प्रेक्षक गॅलरी व पॅव्हेलीयन होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात दुकान गाळे केले जाणार आहेत आणि त्यातून मिळालेल्या अंतर्गत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्विमिंग टॅंक इ. केले जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.