वक्राकार दरवाजातून पडणाऱ्या पाण्यावर तिरंगी लाईट
सरवडे प्रतिनिधी
दुधगंगानगर (तालुका राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागर धरणाला आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली. या विद्युत रोषणाईचा प्रारंभ आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आज धरणाच्या पाच वक्राकार दरवाज्यातून तीन हजार पाचशे कुसेक्स पाण्याचा विसर्ग करून यामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली. वक्राकार दरवाजातून पडणाऱ्या पाण्यावर तिरंगी लाईट पाडल्याने हे दृश्य नयनरम्य दिसत होते. यावेळी कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उप अभियंता भाग्यश्री पाटील, उपअभियंता प्रवीण पारकर, शाखा अभियंता विजय सुतार, अंजली कारेकर, नितीन कोतमीरे, महादेव सावंत, सरपंच संदीप डवर, विनोद डवर, उपसरपंच शांताराम चौगुले, वाय डी पाटील, संग्राम डवर आदींसह शेकडो पर्यटक उपस्थित होते. यासाठी विशेष सहकार्य काळम्मावाडी वाईल्ड लाईफ टुरिझम यांचे लाभले.