Kolhapur Shinde Group On Thackeray Group: कोल्हापुरात आता शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आल्याच चित्र आहे. दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय.शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जयप्रभा स्टुडिओ प्रश्नी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबतच निवेदन शिंदे गटाच्या महिला आघाडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलयं.
दरम्यान, माजी नगरसेवक संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकी दरम्यान प्रतिज्ञापत्रात कोट्यवधींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे. एका व्हिडीओ गेम पार्लरवर एवढी संपत्ती कशी मिळवली असा संशय व्यक्त करत संजय पवार हे व्यापाऱ्यांना धमकी देवून हप्ते गोळा करतात असा गंभीर आरोपही यावेळी महिला आघाडीने केलाय. दरम्यान संजय पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महिला आघाडीने दिलाय.








