भाजयुमोची मागणी; कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा स्टेटस लावणाऱया इंग्रजी शिकवणारा शिक्षक जावेद अहमद याच्या विरोधात देशद्रोहाची तक्रार नोंद झाल्यानंतर त्याला संबंधित शिक्षण संस्थेमधून निलंबित करण्यात आले. या सर्व प्रकरणानंतर सध्या हातकलंगले पोलिसांनी जावेद अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली. सध्या तो पेठ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कस्टडीत ठेवले आहे. अशा देशविरोधी कृत्य करणाऱया व्यक्तीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, अशी मागणी गुरूवारी भारतीय जनता युवा मोर्चाने केली. या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीश खडके आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिचे व्हाईस चेअरमन ऍड. विवेक घाटगे यांना दिले. प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय खाडे पाटील, संघटन सरचिटणीस विवेक गोरा, सुनील पाटील, विश्वजीत पवार, प्रसाद पाटोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.