कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाला 94.22 टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल 95.7 टक्के लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम अटींसह आपआपल्या कनिष्ठ महाविद्यालयातच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली होती. गतवर्षी ऑनलाईन परीक्षेमुळे निकालात फुगवटा झाला होता. गतवर्षीच्या निकालाशी तुलना करता यंदा राज्यासह कोल्हापूर विभागाचा निकाल जवळपास 4 टक्केंनी कमी लागला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात चवथ्या स्थानावर तर यंदा पाचव्या स्थानावर आहे. परंतू यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर कुटुंबिय, नातेवाईक आणि शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.