अजित पवार यांच्या बंडानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामिण जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी अजित पवारांना साथ दिल्याने त्याजागी व्ही. बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुफळी माजल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. ऱाष्ट्रवादीचे ग्रामिण जिल्हा ए.वाय. पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटाकडे जाणे पसंत केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ए.वाय. पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच त्यांनी त्या जागी व्हि. बी. पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर प्रमुख असलेले आर. के. पोवार यांना शहर अध्यक्षपदी कायम ठेवले आहे.









